Mumbai High Court Sakal media
महाराष्ट्र बातम्या

बाद झालेल्या नोटा बदलून द्या; न्यायालयाचे RBI ला आदेश

या प्रकरणी किशोर सोहोनी या याचिका करणाऱ्या डोंबिवलीच्या रहिवाशाला दिलासा मिळाला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला (RBI) १.६ लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी किशोर सोहोनी (Kishor Sohoni) या याचिका करणाऱ्या डोंबिवलीच्या रहिवाशाला दिलासा मिळाला.

किशोर सोहोनी यांनी फसवणुकीच्या एका जुन्या प्रकरणात तक्रार केली होती. या प्रकरणात मार्च २०१६ मध्ये कल्याण न्यायालयाच्या दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये १.६ लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ च्या अंतिम मुदतीपूर्वी पैसे जमा करण्याची परवानगी देण्यासाठी सोहोनी यांनी दंडाधिकारी‍यांना विनंती करूनही त्यांना तसे करण्याची परवानगी देण्यात आली नाही.

त्यानंतर मार्च २०२०मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली. ऑक्टोबर २०२० मध्ये पैसे घेण्यासाठी सोहोनी हे पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी बंद झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. नोटा बदलून देण्यासाठी त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिका केल्याची माहिती किशोर सोहोनी यांनी दिली. मात्र आता त्यांना दिलासा मिळाला असुन मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला १.६ लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे आदेश दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT