High Court Esakal
महाराष्ट्र बातम्या

High Court: 'तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी नृत्य करणे अश्लीलता नाही', मुंबई हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

महिलांनी तोकडे कपडे घालावेत की नाही? यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

महिलांनी तोकडे कपडे घालावेत की नाही? यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. महिलांनी तोकडे कपडे घालणं ही सामान्य बाब आहे, एखाद्या महिलेनं तोकडे कपडे घातले तर त्याला अश्लीतला म्हणता येणार नाही, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे

तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी नृत्य करणे किंवा हातवारे करणे याला अश्लीलता म्हणता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, याला अनैतिक कृत्य मानले जाऊ शकत नाही. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 294 (अश्लीलता) अंतर्गत पाच जणांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

लाइव्ह लॉ नुसार, न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने म्हटले की, 'आमचे मत आहे की आरोपी क्रमांक 13 ते 18 (महिला डान्सर) यांनी लहान स्कर्ट परिधान करणे, उत्तेजक नृत्य करणे किंवा हावभाव करणे, जे पोलिस अधिकार्‍यांनी अश्लील मानले होते, याला अश्लील म्हणता येणार नाही.'

खंडपीठाने सांगितले की, त्यांना भारतीय समाजातील नियमांची जाणीव आहे, परंतु आजच्या काळात महिलांनी असे कपडे घालणे सामान्य आणि स्वीकार्य आहे. 'आम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये कपडे घालण्याचे प्रकार पाहतो, जे सेन्सॉरशिपमध्ये किंवा सौंदर्य स्पर्धांमध्ये पास झाले आहेत, ज्यामुळे कोणालाही कोणतीही अडचण येत नाही. या प्रकरणात आयपीसीचे कलम २९४ लागू नाही.'

प्रकरण काय होते?

पोलिसांनी एका रिसॉर्ट आणि वॉटर पार्कच्या बँक्वेट हॉलवर छापा टाकला होता, जिथे सहा महिला शॉर्ट स्कर्ट घालून नाचत होत्या आणि अर्जदार त्यांच्यावर पैसे ढकलत होते. पोलिसांनी महिला व पुरुष दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सुनावणीनंतर न्यायालयाने 5 जणांविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.

न्यायालयाचे म्हणणे आहे की, जर हे कृत्य सार्वजनिक ठिकाणी केले गेले असेल, अश्लील असेल किंवा कोणाला त्रास देत असेल तर कलम 294 लागू केले जाऊ शकते. हे प्रकरण सार्वजनिक ठिकाणी असले तरी ते अश्लील नव्हते किंवा त्यामुळे कोणाला त्रास होत नाही हे न्यायालयाने मान्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT