Bombay High Court On Marathi Signboard e sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठी समृद्ध भाषा! मराठी पाट्यांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांना मराठीत फलक लावणे (Marathi Signboard) बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला असून हे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

'महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर...' -

नियमाद्वारे सार्वजनिक हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी कदाचित राज्य सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा आहे. परंतु, ती निर्विवादपणे राज्यातील सर्वसमावेशक भाषा आणि राज्याची मातृभाषा आहे. मराठी समृद्ध भाषा असून तिला साहित्य आणि रंगभूमीसारखा सांस्कृतिक वारसा आहे, असं न्यायालयानं याचिका फेटाळताना म्हटलं आहे. मराठी पाट्या अनिवार्य करण्याचा नियम भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मधील तरतुदींचे उल्लंघन करत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल, तर तो सर्वांवर सरकारने लादलेल्या अटीच्या अधीन असेल, असंही मुंबई उच्च न्यायालयानं व्यापाऱ्यांना बजावलं आहे.

देशाच्या काही भागांमध्ये स्थानिक भाषेशिवाय इतर भाषा वापरण्याची परवानगी नाही. पण, महाराष्ट्रात तसं नाही. तुम्हाला इतर भाषेसाठी मनाई नाही. पण, मराठीचे देवनागरी लिपीतील अक्षर हे इतर भाषेतील अक्षरांपेक्षा मोठ असावं. हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर तेथील कामगारांच्या आणि त्यांच्या संपर्क साधणाऱ्या लोकांच्या फायद्यासाठी आहे. या अशा व्यक्ती आहेत ज्यांना मराठीची सर्वाधिक माहिती आहे, असंही न्यायालयानं नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

ASHOK KHARAT CASE: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण...' अशोक खरात प्रकरणी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : सोनिया गांधी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, रुग्णालयाची माहिती

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT