Hasan Mushrif News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif News: मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा; पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

सकाळ डिजिटल टीम

Latest Marathi News: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

हसन मुश्रीफांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.

शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल ९ तास चौकशी केली. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई प्रकरणात न्यायालयात धाव घेतली.

ईडीकडून सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच पालन करत नसल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी याचिका दाखल केली आहे. राजकीय विरोधक असलेले किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत असल्याचा उल्लेख या याचिकेत केला. त्यावर त्यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

ED च्या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. परंतु त्यांची घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी आणि झाडाझडती सुरु होती. त्यावेळी हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झाले होते.

सोमवारी ईडीचे पथक कोल्हापुरात असताना हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ईडीच्या कारवाईविरोधात आपण हायकोर्टात गेल्याचे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे अटक करण्यास मनाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT