BPCL 
महाराष्ट्र बातम्या

'भारत पेट्रोलियम'च्या खासगीकरणाला विरोध; 8 जानेवारीला देशव्यापी संप!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. याला बीपीसीएलमधील अधिकारी संघटनेने तीव्र विरोध केला असून, खासगीकरणाविरोधात 8 जानेवारीला होणाऱ्या औद्योगिक संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. 

बीपीसीएल ही तेल क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. या कंपनीला 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 7 हजार 132 कोटी रुपये निव्वळ नफा झाला, अशी माहिती भारत पेट्रोलियम ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मेढे यांनी दिली.

केंद्र सरकारने खासगीकरण करण्याचा घाट घातल्यामुळे या कंपनीचे सार्वभौमत्व धोक्‍यात आले आहे. या सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, असेही ते म्हणाले. 

देशातील कामगार संघटनांनी 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या औद्योगिक संपात बीपीसीएल ऑफिसर्स असोसिएशन सहभागी होणार असल्याची माहिती मेढे यांनी दिली. खासगीकरणामुळे केंद्र सरकारची अनुदाने कायमची बंद होतील. घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान बंद झाल्यामुळे दुर्बल घटकांना फटका बसेल.

खासगी उद्योगांना सामाजिक योजनांचा गंध उरणार नाही. उज्ज्वला योजनेसारख्या व्यापक योजना बंद होतील. सार्वजनिक उद्योगांमध्ये मागासवर्गांना आरक्षण बंद होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT