sakal breaking 
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! ११०० बॅगा प्लाझ्मा घेऊन जाणारा मालवाहतूक टेम्पो पकडला; पण, कारवाईचा अधिकार कोणाचा? पोलिस, महापालिका, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट

सोलापूर शहरातून परराज्यातील एक मिनी टेम्पो (जीजे ३८, टीए ६३१६) बुधवारी (ता. १०) रक्तातील प्लाझ्माच्या बॅगा तथा पिशव्या घेऊन जात होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तो टेम्पो सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप चौकात पकडला. त्याठिकाणी सदर बझार पोलिस दाखल झाले आणि वाहन ठाण्यात आणले. पण...

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातून परराज्यातील एक मिनी टेम्पो (जीजे ३८, टीए ६३१६) बुधवारी (ता. १०) रक्तातील प्लाझ्माच्या बॅगा तथा पिशव्या घेऊन जात होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तो टेम्पो सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप चौकात पकडला. त्याठिकाणी सदर बझार पोलिस दाखल झाले आणि वाहन ठाण्यात आणले. पण, त्यावरील कारवाईचा अधिकार आम्हाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अन्न व औषध प्रशासनाकडे बोट दाखविले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तो प्लाझमा अधिकृतपणे की अनधिकृतपणे नेला जात होता हे अस्पष्ट होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून गुजरात पासिंगचा मालवाहतूक टेम्पो सात रस्ता परिसरात आडविला. डायल ११२ क्रमांकावर कॉल करून त्यांनी घटनेची माहिती दिली. सदर बझार पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी वाहन तातडीने पोलिस ठाण्यात नेले. त्याठिकाणी महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. राखी माने आल्या. टेम्पोतील ३४ बॉक्समध्ये प्रत्येकी ३० बॅगा होत्या. त्या बॅगा माल वाहतूक वाहनात शेतमाल भरल्यासारखा भरला होता.

वैद्यकीय नियमानुसार अशी वाहतूक योग्य नसल्याचे डॉ. राखी माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मालवाहतूक वाहनातून तो प्लाझ्मा गुजरात येथील अहमदाबादच्या इंटास फार्मा कंपनीकडे जात होता. तो कोठून व कोणासाठी जात होता, त्यासाठी परवानगी होती का, याची माहिती रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती. पकडलेला प्लाझ्मा खराब होऊ नये म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमधील रक्तपेढीत ठेवल्याचे सांगण्यात आले.

तिन्ही विभागाचे अधिकारी म्हणाले....

  • पोलिस म्हणाले, ’रक्तातील प्लाझ्मा घेऊन जाणारे वाहन सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप चौकात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. ते वाहन पोलिस ठाण्यात आणले. त्याठिकाणी महापालिकेच्या आरोग्याधिकारी आल्या. या प्रकरणात पोलिसांना थेट गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांच्या ताब्यात ते वाहन दिले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई होईल’.

  • महापालिकेचे आरोग्याधिकारी म्हणाले, ‘ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित येते, त्यामुळे हा प्रकार संबंधितांना कळविला आहे. ते कागदपत्रांची पडताळणी करतील, त्यात गैर आढळल्यास कंपनी व वाहनाविरूद्ध कारवाई करतील.’

  • अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त म्हणाले, ‘प्लाझ्मा घेऊन जाणारे वाहन पकडल्याची माहिती मिळाल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास सदर बझार पोलिसांत आलो. पण, मला ते पहायला मिळाले नसून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे लोक ते वाहन कोठे घेऊन गेले माहिती नाही. कागदपत्रे पाहिल्यावर हा विषय माझ्याकडे येतो की नाही हे सांगता येईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy, Video: W,W,W,W,W,W... दोन भारतीय गोलंदाजांनी एकाच डावात घेतल्या दोन हॅटट्रिक! ९० वर्षात पहिल्यांदाच घडलं असं

Arabian Sea Low Pressure : अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार?

Crime: ८ वर्षांपासून प्रेम, पण लग्नाआधी प्रियकराची भलतीच मागणी, प्रेयसीला मोठा धक्का बसला अन् पोरीनं नको तो निर्णय घेतला

अमरावतीत 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीचा राहत्या घरी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Burn Belly Fat: जिमला न जाता घरच्या घरी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दिपिका पदुकोणच्या ट्रेनरने दिल्या खास टिप्स, पाहा Video

SCROLL FOR NEXT