Thane  sakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! स्वाक्षरीसाठी साहेबांना द्यावे लागतात म्हणून घेतली लाच; मोजणीनंतर विहीर, बोअरवेल नोंद करण्यासाठी मोजणी ऑफिसमधील लिपिकाने रिक्षा चालकामार्फत घेतले ९००० रूपये

मोजणीनंतर स्वत:च्या हिश्यात विहीर, बोअरवेल नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून रिक्षा चालकामार्फत लाच घेणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला) आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा. हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांना अटक करण्यात आली.

तात्या लांडगे

सोलापूर : मोजणीनंतर स्वत:च्या हिश्यात विहीर, बोअरवेल नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून रिक्षा चालकामार्फत लाच घेणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला) आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा. हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांना अटक करण्यात आली. त्या दोघांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार यांची वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे सात हेक्टर ५२ गुंठे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदार व त्यांच्या भावांच्या क्षेत्राची रीतसर मोजणी झाल्यानंतर पोटहिस्सा पाडून नकाशे मिळाले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या पोटहिश्यातील विहीर व बोरवेलची नोंद लावण्यासाठी आकारफोड बाबत दक्षिण सोलापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास अर्ज केला होता. ते काम करून साहेबांची स्वाक्षरी घेऊन तहसिल कार्यालयास पाठविण्यासाठी संशयित आरोपीने दहा हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २८) पडताळणी दरम्यान शंकर बजबळकर याने तडजोडअंती नऊ हजाराची लाच घेण्याचे मान्य करून रक्कम रिक्षा चालक सर्वगोड यास द्यायला सांगितले. तो खासगी इसम होटगी रोडवरील किनारा हॉटेल परिसरात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला. संशयित आरोपीच्या घर झडतीसाठी पथक तत्काळ रवाना करण्यात आले असून त्यावेळी घरात काही सापडले नाही. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले व पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार एस. व्ही. कोळी, अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, राजू पवार, सचिन राठोड व चालक राहुल गायकवाड, अक्षय श्रीराम यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

Rahul Gandhi: ''मोदींमध्ये हिंमत असेल तर...'', ट्रम्प यांचं नाव घेऊन राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

Latest Maharashtra News Updates: हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

ENG vs IND, Video: गौतम गंभीर का तापला? ओव्हलच्या क्युरेटरची प्रतिक्रिया आली समोर; म्हणाले, 'मी पहिल्यांदाच...'

Pushpa Entry at Mantralaya Video : …अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला ‘पुष्पा’ पोहचला थेट मंत्रालयात

SCROLL FOR NEXT