police

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! सोलापुरातील शिवसेनेचा ‘हा’ माजी पदाधिकारी तडीपारांच्या यादीत; आतापर्यंत 9 गुन्हे दाखल; सहायक पोलिस आयुक्तांकडे प्रस्ताव

पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी अडीच वर्षांत तब्बल १२५ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापुरातून तडीपार केले आहे. आता सोलापुरातील शिवसेनेचा माजी पदाधिकारी तडीपारीच्या यादीत असून त्याच्याविरूद्ध आतापर्यंत शरीराविषयक तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. वारंवार सांगूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी अडीच वर्षांत तब्बल १२५ पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना सोलापुरातून तडीपार केले आहे. आता सोलापुरातील शिवसेनेचा माजी पदाधिकारी तडीपारीच्या यादीत असून त्याच्याविरूद्ध आतापर्यंत शरीराविषयक तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. वारंवार सांगूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर शहरातील नागरिकांना वेठीस धरणे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचेल असे कृत्य करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध (ज्याच्याविरुद्ध शरीराविषयक व मालाविषयक दोन किंवा त्याहून जास्त गुन्हे दाखल आहेत असा सराईत गुन्हेगार) कलम ५६ नुसार तडीपारीची कारवाई केली जाते. तत्पूर्वी, स्थानिक पोलिसांकडून प्रकरण १६ व १७ नुसार प्रस्ताव मागवून घेतला जातो. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्तांकडून त्या व्यक्तीवर दाखल गुन्ह्यांची चौकशी करून अहवाल तयार केला जातो. त्यानंतर पोलिस उपायुक्त त्या सराईत गुन्हेगारास तडीपार करतात.

सोलापूर शहरातील आणखी १९ सराईत गुन्हेगार तडीपारीच्या रांगेत आहेत. त्यात शिवसेनेचा एक माजी पदाधिकारी आहे. सरकारी कामात अडथळा करणे, शासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, मारमारी अशा प्रकारचे नऊ गुन्हे त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध दाखल आहेत. गणेशोत्सव काळात देखील एक गुन्हा त्या पदाधिकाऱ्याविरूद्ध दाखल झाला आहे. त्यामुळे शहरातील एका पोलिस ठाण्याने त्या पदाधिकाऱ्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठविला आहे.

पोलिस उपायुक्त बजावणार नोटीस

सदर बझार पोलिसांकडून प्राप्त झालेला तडीपारीचा प्रस्ताव आता सहायक पोलिस आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यावर पोलिस उपायुक्तांकडून संबधितास नोटीस बजावली जाईल. त्या व्यक्तीलाही म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाते. त्यानंतर त्या सराईत गुन्हेगारास तडीपार केले जाते. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांवर रेकॉर्डब्रेक तडीपारीची कारवाई केली आहे. मागील ३० महिन्यांत शहर पोलिसांनी तब्बल १६४ सराईत गुन्हेगारांना सोलापूरमधून हद्दपार केले आहे.

पालकमंत्र्यांकडूनही पोलिसांना सक्त आदेश

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील पोलिसांना वाळू तस्कर, अवैध धंदेवाले, व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी. त्यांना तडीपार करावे, असे सक्त निर्देश दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी मागील चार महिन्यात २० पेक्षा अधिक वाळू तस्करांवर तडीपारीची कारवाई केली आहे. सोलापूर शहर पोलिस देखील सराईत गुन्हेगारांवर तशीच कारवाई करीत आहेत.

तडीपारीची वर्षनिहाय कारवाई

  • सन तडीपार

  • २०२३ ४९

  • २०२४ ७३

  • २०२५ २३

  • प्रस्तावित १९

  • एकूण १६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: ‘लालपरी’ला यंदा प्रवाशांकडून ‘भाऊबीज’! दिवाळी सुटीत अवघ्या अकरा दिवसांत कमावले पावणेबारा कोटी

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

Railway Ticket Booking: १-२ नोव्हेंबरला रेल्वे तिकीट बुकिंग राहणार बंद; जाणून घ्या कारण आणि वेळ

फेक कॉल सेंटरचा मास्टरमाइंड फारुकीला गोव्यात ठोकल्या बेड्या; अलिशान सात कार केल्या जप्त, पोलिसांना टिप मिळाली अन्...

SCROLL FOR NEXT