raj thackeray ayodhya visit brijbhushan singh Brij Bhushan Singh
महाराष्ट्र बातम्या

Brij Bhushan Singh : बृजभूषण यांच्याविरोधात मनसे आक्रमक; लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. (WFI president Brij Bhushan Sharan Singh news in Marathi)

बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. तेव्हापासून मनसे आणि बृजभूषण यांच्यात संघर्ष सुरू होता. मात्र राज ठाकरे यांनी मनसेनिकांना शांततेचं आवाहन केलं होतं. शिवाय बृजभूषण यांच्या पुणे दौऱ्याला विरोध न करण्याच्या सूचना मनसैनिकांना करण्यात आल्या होत्या. मात्र आता बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होताच मनसे आक्रमक झाली आहे.

मनसेनेते प्रकाश महाजन म्हणाले की, बृजभूषण हा गुंड प्रवृत्तीचा आहे. ज्या महिला कुस्तीपट्टूंनी आरोप केले, त्यांच्या साक्षी मलिक आहे. साक्षीने निवडणूक लढवली असेल. त्या भाजपशी निगडीत आहे. राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावेळी आम्हाला सोडा, बृजभूषण यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला वेठीस धरलं होतं. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं यावर काय म्हणणं आहे, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला.

दरम्यान षडयंत्र रचून राज ठाकरे यांना आयोध्येला जाण्यापासून रोखलं होतं. असे लोक भाजपमधील असतील, तर २०२४ मध्ये कसं होईल. भाजपचं यावर काय म्हणण आहे,असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला. भाजप यावर मुग गिळून बसलं आहे. भाजप त्यांच्यावर कारवाई करेल, याची शक्यता कमी आहे. तो तिकडचा शिक्षणसम्राट आहे. बाहुबली नेता आहे. यावर आता भाजपच्या महिला आघाडीनेच उत्तर द्यावं, असं आवाहनही प्रकाश महाजन यांनी केलं.

या माणसाची प्रवृत्तीच चूक आहे. त्याची हकालपट्टी व्हायला हवी. आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला आहे. जंतरमंतर या सार्वजनिक ठिकाणी आरोप झाले आहेत. त्यामुळे अशा माणसाला धडा शिकवायला हवा, अशी मागणी महाजन यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT