Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane: महाराष्ट्रातही आता धर्मांतरविरोधी कायदा आणा; नितेश राणेंची मागणी

निरपराध महिलांच्या सुरक्षेसाठी हा कायदा आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातही आता धर्मांतरविरोधी कायदा आणा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राज्यात आता भगवाधारी सरकार आल्यानं इतर राज्यांप्रमाणं महाराष्ट्रातही हा कायदा आणावा अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं आहे. (Bring anti conversion law now in Maharashtra demand by MLA Nitesh Rane)

महाराष्ट्रात आता भगवाधारी सत्तेत आहेत, त्यामुळं हीच वेळ आहे की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांप्रमाणं आपणही धर्मांतरविरोधी कायदा आणावा. याद्वारे आपल्याला निपराध महिलांना जाळ्यात अडकवणाऱ्यांपासून आणि छळपासून संरक्षण करायला हवं. लवकरच याची सुरुवात होईल. जय श्रीराम!! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिल्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये प्रेमप्रकरण, लग्नाचं आमिष याद्वारे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केल्याची उदाहरण समोर येत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यांनी धर्मांतरविरोधी कायदा तयार करुन अशा महिलांना न्याय दिला आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा आणून या महिलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असं राणे यांनी म्हटलं आहे.

...तर आम्ही विरोध करु - आशिष शिंदे

दरम्यान, राणेंच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले, "काही अनुचित प्रकार घडत असतील आणि कायद्याचा प्रश्न उपस्थित होत असेल तर आम्ही या मागणीचा विरोध करु. पण फसवणुकीच्या उद्देशानं जर असं घडत असेल तर कायद्यानुसार जरूर कारवाई व्हावी. आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, पूरस्थिती आहे. राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती अशा काळात लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ही मागणी होत आहे असं तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT