Mumbai news esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai : भावा तू यूपीएससी कर! मुंबईच्या रिक्षावाल्याचं जनरल नॉलेज बघून चक्कर येईल

नेमकं काय म्हणतोय ड्रायव्हर ते लिंक वर क्लिक करा आणि एकदा बघूनच घ्या

सकाळ डिजिटल टीम

Mumbai : बऱ्याचदा असं घडतं की, तुम्ही तासनतास ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले असता. मग आपण इकडं तिकडं बघत बसतो. असंच बघता बघता आपली नजर इतर गाड्यांच्या काचांमधून आत जाते. म्हणजे टाईमपास करण्यासाठी लोक काय काय करतील याचा अंदाज आपल्या नजरेला येतो.

असंच एक इन्स्टाग्राम युजर राजीव कृष्णा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तासभर अडकला होता. या ट्रॅफिकमध्ये त्याच्या ऑटो ड्रायव्हरने त्याचं असं काही मनोरंजन केलं की, तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

राजीव कृष्णाने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय. सोबतच त्यादिवशी काय घडलं हा किस्सा सुद्धा लिहिलाय. राजीव लिहितो की, 'मी मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो होतो. गुगल मॅप्सने 3 किलोमीटरसाठी एक तास लागणार असल्याचं दाखवलं. मला असं वाटलं रिक्षा सोडून पायी चालत जाणं बेस्ट राहील. पण माझ्या रिक्षा ड्रायव्हरने मला त्याच्या बोलण्यात अडकवलं. आणि मला पण ते बोलणं जाम आवडलं.

राजीव पुढं लिहितो की, "त्यानंतर ड्रायव्हरने मला विचारलं की तुम्ही कोणत्या देशांना भेट दिल्या आहेत. यावर त्याची मजा घ्यावी म्हणून मी ही काही ठिकाणांची नावं सांगितली."पण त्यानंतर ड्रायव्हरने जे बोलायला सुरुवात केली त्याची साधी कल्पना सुद्धा राजीवने केली नसेल. नेमकं काय म्हणतोय ड्रायव्हर ते लिंक वर क्लिक करा आणि एकदा बघूनच घ्या.

या व्हायरल व्हिडिओमधला ड्रायव्हरला वेगवेगळ्या खंडातील देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नावं सांगतोय. विशेष म्हणजे रिक्षाचालक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे. या एका तासाच्या काळात ड्रायव्हरने नोटाबंदी, 2जी घोटाळा आणि पनामा पेपर्स सारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी शूट केलेला हा व्हिडिओ आता एकदम वेगात व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या व्हिडिओला 38 हजार लाईक्स मिळालेत. लोक या व्हिडिओवर कमेंटही करतायत. पण या सगळ्या कमेन्टमध्ये एका इन्स्टाग्राम युजरने खूपच भारी कमेंट केली आहे. यात तो म्हणतो, 'हा रिक्षाचालक बहुतेक खान सरांचा विद्यार्थी असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT