महाराष्ट्र बातम्या

BRS Nagpur Office : 'गरज नसलेल्या गोष्टी आपण का आयात करतोय?', KCR संतापले; 'BRS' नागपूर कार्यालयाचं उद्घाटन

संतोष कानडे

नागपूरः के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या नागपूर कार्यालयाचं आज त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालं. यावेळी केसीआर यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरलं. पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नैसर्गिक संसाधनांचा विनियोग, यावर त्यांनी भाष्य केलं.

यावेळी बोलतांना केसीआर म्हणाले की, BRS पक्षाच्या स्थापनेचा उद्देश हा आहे की, देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज आहे. आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केलीय, १० दिवसानंतर आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत.

देशात सर्व स्तरातील लोक नाराज आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडलीय, मेक इन इंडिया कुठे गेली माहित नाही, गरज नसलेल्या वस्तूंची आयात वाढलीय त्यामुळे नव्या विचारांची देशाला गरज असल्याचं केसीआर म्हणाले.

काय म्हणाले केसीआर?

  • आपला देश कृषी प्रधान आहे तरीही १ लाख कोटीचे पामतेल आयात करतोय. हे तात्काळ थांबायला हवं

  • सर्वांना आवाहन करतोय की देशात चांगल्या दर्जाच्या परिवर्तनाची गरज आहे

  • चायनातून बऱ्याच गोष्टी आयात करतोय. आपण बनवू शकतो त्या गोष्टीही आपण आयात करतोय

  • संविधान, ज्युडीसरी अशा बऱ्याच गोष्टीत स्ट्रक्चरल बदल होणं गरजेचं आहे

  • पाणी आणि वीज.. महत्त्वाचे विषय. गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्याकडे आहे.

80 टक्के पाणी समुद्रात वाहून जातं

केसीआर म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत धोरणं न बदलल्याने ८० टक्के पावसाचं पाणी समुद्रात वाहून जात आहे. पाणी प्रश्नावर राज्यांना आपापसात का लढवलं जातंय? अन्न प्रक्रिया उद्योग वाढून, निर्यात वाढायला हवी पण तसं होतांना दिसत नाही.

दमदार सरकार असलं तर देशात अशी शेती आहे, की प्रत्येक एकरात पाणी दिलं जाणं शक्य आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत पाण्याची समस्या आहे. आज प्रत्येक गोष्टीत आपण खाली चाललोय, असं त्यांनी नमूद केलं. नागपूर येथे बीएसआर पक्षाच्या कार्यायाच्या उद्घाटन आज सायंकाळी त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT