Ajit Pawar Devendra Fadnavis and Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Budget Session : विरोधक आक्रमक होताच CM शिंदेंच्या मदतीला धावले फडणवीस, 'मविआ'ला दिलं ओपन चॅलेंज

राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन (Budget Legislature Session) सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (मंगळवार) जोरदार आंदोलन केलं.

राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन (Budget Legislature Session) सुरू आहे. कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाला सुरवात झालीये.

सध्या कांद्याचे दर नीचांकी पातळीवर आले असून राज्य आणि केंद्र सरकारकडून उपाययोजना होत नसल्याने कांद्याचे दर रोजच घसरत आहेत. दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आज (मंगळवार) जोरदार आंदोलन केलं.

गळ्यात कांद्याच्या माळा घालून हे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. ‘सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी’, ‘मिळालाच पाहिजे…मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे’ ‘गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात’ अशा घोषणा या आमदारांनी दिल्या. या आंदोलनात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे सहभागी झाले होते.

दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर विरोध आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सभागृहात कांद्याच्या दराविषयी प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे आक्रमक झाले. यावेळी त्यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची दमछाक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिंदेंच्या मदतीला धावून आले.

फडणवीस म्हणाले, आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की, राजकारण करायचं आहे हे एकदा ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री सांगताहेत, कांद्याची नाफेड खरेदी सुरु केलीये. यांच्याकडं (मविआ) वेगळी माहिती असेल तर त्यांनी द्यावी, असं खुल आव्हान फडणवीसांनी महाविकास आघाडीला करत शिंदेंच्या मदतीला धावून गेले. दरम्यान, कांद्यावरुन सभागृहात गोंधळ पहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT