अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन
महाराष्ट्र बातम्या

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) मुंबईतच होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरात घ्यावे यासाठी राज्यपाल यांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे नागपुरात अधिवेशन घेता येणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक ९ फेब्रुवारीला सांगितले होते. (Budget session in Mumbai)

करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाले आहेत. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे दोन वर्षांत एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २८ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे पत्रक निघाले होते, हे विशेष...

९ फेब्रुवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी विधिमंडळ सचिवालय यांनी जी माहिती पुढे ठेवली त्यानुसार नागपूरमध्ये अधिवेशन घेतल्यास राज्यपालांच्या अभिभाषणासाठी संयुक्त सभागृह नाही, आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. अशात आजच्या घडीला अधिवेशन नागपूरला घेणे शक्य नाही, असे स्पष्ट केले आहे. या शिफारशीनुसार १५ फेब्रुवारीला होणाऱ्या समितीच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत घेण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. आज झालेल्या बैठकीत अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थ्यांकडून सरकार वसूल करणार रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Fifa World Cup 2026: दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला, Mumbai Indians कडूनही जोरदार सेलिब्रेशन; दोघांचं नेमकं काय कनेक्शन?

RTI Andolan: अण्णा हजारे आक्रमक! आरटीआय कायद्याविरोधात पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा; राळेगणसिद्धीत चर्चा निष्फळ

रोमान्स, हॉरर आणि भावनांचा संगम; सई मांजरेकरच्या 'इकाई'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Latest Marathi News Live Update : महायुतीतील २१८ मतांची गूढ फूट; पराभवानंतर भाजपकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT