solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

गाणगापूरहून कुर्डुवाडीकडे निघालेली बस जळून खाक! इंजिनमधून निघाला धूर, चालकांनी थांबविली बस अन्‌ वाहकाने २ मिनिटात उतरविले ४८ प्रवासी, १० मिनिटात बसने घेतला पेट

कुर्डुवाडीहून गाणगापूरला जाऊन तेथून पुन्हा कुर्डुवाडीकडे निघालेली बस (एमएच २०, बीएल ४२१५) कुंभारी टोल नाक्याजवळील पेटली. चालकाने प्रसंगावधान साधून गाडी थांबवली व बसमधील ४८ प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर काही मिनिटांनी बसने पेट घेतला आणि अर्ध्या तासात बस प्रवाशांसमोरच आगीत भस्मसात झाली.

तात्या लांडगे

सोलापूर : कुर्डुवाडीहून गाणगापूरला जाऊन तेथून पुन्हा कुर्डुवाडीकडे निघालेली बस (एमएच २०, बीएल ४२१५) कुंभारी टोल नाक्याजवळील पेटली. चालकाने प्रसंगावधान साधून गाडी थांबवली व बसमधील ४८ प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर काही मिनिटांनी बसने पेट घेतला आणि अर्ध्या तासात बस प्रवाशांसमोरच आगीत भस्मसात झाली.

कुर्डुवाडी येथून सोमवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता गाणगापूरच्या दिशेने बस रवाना झाली होती. त्यानंतर ती बस दुपारी सव्वातीनच्या सुमारास प्रवाशांना घेऊन कुर्डुवाडीच्या दिशेने निघाली. वळसंग टोल नाका ओलांडून काही अंतरावरील कुंभारी पुलावर आल्यावर बोनेटमधून धूर येऊ लागला. चालक प्रशांत पांचाळ यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. गाडीच्या बोनेटमधून धूर येत असल्याने वाहक सुभाष महिंद्रकर यांनी प्रसंगावधान साधून गाडीतील ४८ प्रवासी (४४ प्रौढ व चार लहान मुले) काही मिनिटातच खाली उतरवून दूर अंतरावर नेले. १० मिनिटात गाडीने पेट घेतला आणि पाहता पाहता बस अर्ध्या तासात जळून खाक झाली.

गाडीचा तीन महिन्यांपासून कोणताही प्रॉब्लेम नव्हता, आठ वर्षांपूर्वीची जुनी बस असताना देखील टकाटक होती, असे आगारप्रमुखांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी अग्निशामक विभागाचा बंब दाखल झाला आणि आग विझविली. पण, तोवर अख्खी बस जळून खाक झाली होती.

‘अग्निशामक’ला विलंब अन्‌ बस पूर्ण जळाली

सोलापूर शहरापासून काही किमी अंतरावरील कुंभारी पुलावर बस पेटत होती. त्यावेळी चालक-वाहकाने सोमवारी सायंकाळी ६.२१ वाजता अग्निशामक विभागाला संपर्क करून मदत मागितली. पण, अग्निशामक गाडी पोचायला ३५ ते ४५ मिनिटे लागली, तोपर्यंत बसगाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशामकची मदत १५ मिनिटात मिळाली असती तर आमची बस वाचली असती, अशी हळहळ कुर्डुवाडी आगारप्रमुखांनी व चालक-वाहकांनी व्यक्त केली.

तीव्र उन्हात जुनाट गाड्यांना दूरचा प्रवास नको

राज्यातील अनेक विभागांमध्ये विशेषत: सोलापूर विभागात आठ-दहा वर्षांपूर्वीच्या जुनाट बसगाड्यांची संख्या मोठी आहे. सात-आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या बसगाड्या तीव्र उन्हात लांबच्या प्रवासासाठी पाठविल्या जातात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा जुन्या गाड्यांना दूरचा प्रवास नकोच, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT