Sharad Pawar and Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : शरद पवार-संजय राऊतांचा फोटो शेअर करत भाजपने ठाकरे गटाला डिवचलं, म्हटलं...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. यावर आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला डिवचलं आहे.

भाजपच्या महाराष्ट्र भाजपच्या ट्विटवर हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटोला काम फत्ते असं कॅप्शन देण्यात आलं आहे. एकंदरीतच भाजपने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला डिवचलं आहे.

याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मिळाल्यावर प्रतिक्रिया दिली होती. फडणवीस म्हणाले होते की, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर जो पक्ष होता त्यांच्याच पक्षाला पुन्हा नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यासाठी शिंदे यांचे अभिनंदन. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो, कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर आधिकार सांगू शकत नाही. शिंदेना देखील निकालाचा आत्मविश्वास होता,असंही फडणवीस यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'राजकारणात नाही, मिमिक्रीत असते तर...'; देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं; राजकीय वातावरण तापलं

Dombivali News : डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजकारण तापले! 'डोंबिवलीचा रवी कुठे?' राजू पाटील यांचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल

MHA New Guidelines: राष्ट्रगीत गायनासंदर्भात नवीन नियमावली; केंद्रीय गृहमंत्रालयाचे नवे आदेश

Uruli Kanchan Crime : पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बळजबरीने अत्याचार; उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांना शिवीगाळ, कागद भिरकावत वकिलाचे न्यायमूर्तींनाच आदेश; सुनावणीवेळी हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT