mhada exams esakal
महाराष्ट्र बातम्या

Exam: म्हाडाची परीक्षा आता TCS घेणार; मंत्रीमंडळाचा निर्णय

आरोग्य-म्हाडा परीक्षेत गोंधळ झाल्यानंतर सरकारचा महत्वाचा निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) रद्द झालेल्या परीक्षेची जबाबदारी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व प्रकारच्या भरती परीक्षा या TCS, MKCL, IBPS या संस्थांमार्फत घेण्यात येणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. (Cabinet decision responsibility for planning MHADA exams on TCS)

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढे एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), आयबीपीएस (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) यांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. महिन्याभरापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामध्ये बैठक झाली होती, तेव्हाच परीक्षा घेण्यासाठी MKCLवर शिक्कामोर्तब झालं होतं. तर म्हाडाच्या परीक्षेबाबत काल एक बैठक झाली होती त्यामध्ये TCSचं नाव निश्चित झालं.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात शासकीय विभागांच्या भरतीच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी विविध आयटी कंपन्यांवर सोपवली होती, त्यावरून नाराजी होती. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्र्यांची बैठक पार पडली होती.

आरोग्य भरती आणि म्हाडा भरतीच्या परीक्षेत गोंधळ

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' गटाच्या परीक्षांचा पेपर फुटला होता. हा पेपर थेट आरोग्य संचालनालयातील एका बड्या अधिकाऱ्यानं फोडल्याचं तपासाअंती समोर आलं आहे. सहसंचालक महेश सत्यवान बोटले (मुंबई) यांच्यासह शिक्षक नामदेव विक्रम करांडे (बीड), उमेश वसंत मोहिते (उस्मानाबाद) आणि प्रकाश दिगंबर मिसाळ (मावळ) यांना नुकतीच अटक झाली आहे.

तसेच म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या परीक्षांना ११ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होऊन पुढील काही दिवसांत पार पडणार होत्या. पण या परीक्षेसाठी पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांकडून समोर येताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री उशीरा व्हिडिओ ट्विट करत पुढे ढकलल्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT