Eknath Shinde Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion : १९ जूनच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, नव्या चेहऱ्यांना भाजप देणार संधी

संतोष कानडे

मुंबईः १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.

काल पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे.

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्याच अनुषंगाने काल चर्चा झाल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेनेचा वर्धापन दिन असलेल्या १९ जूनच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. जे आमदार आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे सरकारची बाजू मांडत आहेत, त्यांना मंत्रिपदं मिळू शकतात.

भाजपच्या 'मिशन ४५'ला फायदशीर ठरेल अशांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित शाह यांनी संभाव्य मंत्र्यांची सर्व माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतल्याचं कळतंय. अखेरचा निर्णय अमित शाह हेच घेणार असून आता दहा ते पंधरा दिवसांमध्ये मंत्रिमंळाचा विस्तार होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT