शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज पहिल्या टप्प्याचा (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यासाठी राजभवन सज्ज झालं आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांचा घेतलेला आढावा.. 
महाराष्ट्र बातम्या

शपथविधी झाला आता खातेवाटप कधी? CM शिंदे म्हणाले, आजपासूनच...

कुठल्या मंत्र्यांना कुठलं खातं मिळण्याची शक्यता जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. यामध्ये १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिमदाची शपथ घेतली. पण आता या मंत्र्यांना कुठली खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप कधी होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. (cabinet expansion done now when will portfolio distributed CM Eknath Shinde gives Info)

"कॅबिनेटचा विस्तार आज पार पडला. आजपासूनच हे मंत्री पूर्ण क्षमतेनं काम सुरु करतील. तसेच लवकच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्विकारतील. हे छोट मंत्रिमंडळ असून उर्वरित विस्तार अद्याप बाकी आहे," असं CM शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.

कोणाला कुठलं मंत्रीपद?

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, महत्वाची खाती भाजपला देण्याची चर्चा आहे. यामध्ये गृहमंत्री आणि अर्थ खातं फडणवीस, महसूल खातं राधाकृष्ण विखे-पाटील, ऊर्जा खातं मुनगंटीवार तसेच पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम यांसारखी महत्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडे जातील अशी माहिती सूत्रांकडून कळते.

तर शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी उद्योग खातं उदय सामंत यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. पण नेमकं हे खातेवाटप कधी होईल याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. कदाचित आजच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपांबाबत चर्चेसाठी काही वेळ लागू शकतो. त्यानंतर एक-दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT