Cabinet Expansions Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansions: नवरात्रीत मंत्रिमंडळ विस्ताराची वाटली जाणार खिरापत? तिन्ही पक्षांना विस्ताराची गरज मान्य

महाराष्ट्रात नवरात्रीच्या सुमारास विस्तार करता येईल का, ही शक्यता तपासून पाहिली जातं आहे

सकाळ वृत्तसेवा

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची नितांत आवश्यकता मान्य करतानाच अजित पवार गट महामंडळांसाठी तर शिंदे गट पालकमंत्रिपदांसाठी आग्रही आहे. सहकारी आमदारांना दिलेल्या शब्दानुसार मंत्रिपद देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे समजते.

रायगड, नाशिक या दोन जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे मुख्यमंत्री शिंदे यांनी कमालीची प्रतिष्ठेची केली असून अजित पवारांना त्यांच्या समर्थकांसाठी महामंडळे हवी आहेत. अंतर्गत सत्तासंघर्षाचा अन् सरकारच्या कारभाराचा फटका बसू नये यासाठी आम्ही म्हणू ती महामंडळे द्या, अशी नवी मागणी अजित पवार गटाकडून पुढे आली आहे.

महाराष्ट्रात सतत पुढे येणारे नवे प्रश्न हाताळणे, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोरचे आव्हान ठरले आहे. चार राज्यांच्या विधानसभांच्या तिकीटवाटपाचे आव्हान भाजपसमोर असतानाच महाराष्ट्रात नवरात्रीच्या सुमारास विस्तार करता येईल का, ही शक्यता तपासून पाहिली जाते आहे.

नक्षलवादविरोधी बैठकीसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. भाजपने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या मित्र पक्षांना सामावून घेत त्यागाचे धोरण स्वीकारले असले तरी कार्यकर्त्यांना कुठवर नाराज करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. भाजप , शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला विस्तार हवा असला तो करताना सर्वांना कसे सामावून घेतले जाईल, यावर विचार करावा लागणार आहे.

नाशिक भुसे यांनाच हवे

छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाशिकचे पालकमंत्रिपद द्यावे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार कमालीचे आग्रही आहेत, तर शिंदे यांना नाशिकच्या टापूत त्यांच्या गटाचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी दादा भुसे पालकमंत्री हवे आहेत. रायगड जिल्हा आदिती तटकरे यांना सोपवला जावा, असे अजित पवारांना वाटते, तर शिंदे यांना भरत गोगावले यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर हा जिल्हा त्यांच्याकडे सोपवायचा आहे. सातारा जिल्ह्याबाबतही वाद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT