Cabinet Expansion esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansion: पुन्हा पंकजा मुंडेंचा पत्ता होणार कट?

संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले, पण...

धनश्री ओतारी

नव्या सरकारमधील मंत्रिमंडळात पक्षातील ज्येष्ठांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती भाजपची असली तरी ऐनवेळी ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे दिसत आहे. कारण मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले मात्र, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.(Cabinet Expansion maharashtra Pankaja Munde ministerial position in the shinde government)

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात भाजपच्या दहा आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काल रात्री सागर बंगल्यावर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले याची काही नावेदेखील समोर आली आहेत. मात्र, त्या यादीत पंकजा मुंडेंचे नाव नसल्याचे राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे.

जप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार हेही सागर बंगल्यावर रात्री दाखल झाले होते. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.

पंकजा मुंडेंचा पत्ता कट?

पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये तरी पंकजा यांना मंत्रीपद मिळणार का असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे. इतर नेत्यांना फोन आल्याची चर्चा आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना फोन आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नावाची चर्चाही सध्या होत नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळणार?

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा आहे. माधुरी मिसाळ या पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वर्ष निवडून आल्या आहेत. पुण्यातील भाजपचं वजनदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. मंडई परिसारातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या सोबतच 2019 मध्ये त्यांनी पुण्याच्या भाजपच्या शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी मंत्रीमंडळात लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT