Eknath Shinde_Devendra Fadnvis 
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारावर आज शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना

येत्या तीन-चार दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मंत्रिमडळाचा विस्तार पुढील तीन ते चार दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा झाल्यानंतर आजच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Cabinet expansion may sealed today CM Shidne DyCM Fadnvis left for Delhi)

दिल्लीत आज मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. याचदरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा होणार आहे.

दरम्यान, भाजपकडून कोणाकोणाला संधी मिळू शकते यामध्ये चंद्रकांत पाटील (पश्चिम महाराष्ट्र), सुधीर मुनगंटीवार (विदर्भ), गिरीश महाजन (उत्तर महाराष्ट्र), राधाकृष्ण विखे-पाटील (पश्चिम महाराष्ट्र), आशिष शेलार (मुंबई), प्रवीण दरेकर (मुंबई), चंद्रशेखर बावनकुळ (विदर्भ) या नेत्यांना मंत्रीपदासाठी संधी मिळू शकते.

तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील (उत्तर महाराष्ट्र), उदय सामंत (कोकण), दादा भुसे (उत्तर महाराष्ट्र), शंभूराज देसाई (पश्चिम महाराष्ट्र), अब्दुल सत्तार (मराठवाडा), संदिपान भुमरे (मराठवाडा) या नेत्यांना मंत्रीपदासाठी शिवसेनेकडून संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT