Eknath Shinde and Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

ठरलं! राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 10 मंत्र्यांना शपथ देणार, अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार

सकाळ डिजिटल टीम

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 10 मंत्र्यांना शपथ देणार, अधिवेशनानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 10 मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच तर आणि भाजपचे पाच मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती 'साम' या वृत्तवाहिनीने दिली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी 10 मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात कोणाला संधी मिळणार हे पहावे लागणार आहे.

राज्यातील सत्ताबदलनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार कारभार पाहत असून अद्याप या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या शपथविधी संदर्भात बातमी समोर येत आहे. हा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.

दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. तत्पूर्वी 'एनडीए'च्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा १४ जुलै रोजी मुंबई भेटीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यामुळे १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दिल्लीतलं वातावरण तापलं! राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार 'गांधी स्मृतीस्थळा'वर दाखल

Pandharpur Wari Relief : आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यानंतर हात दाखविलेल्या ठिकाणी थांबणार एसटी बस

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

SCROLL FOR NEXT