Bjp MNS Alliance : मुंबईतील मराठी माणसांसाठी राज ठाकरेंना जवळ करत असाल तर, याचा मोठा फटका देशपातळीवर बसू शकतो असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भजपला दिला आहे. तसे बघितले गेल्यास भाजपाला मनसेची गरज नसल्याचे ते म्हणाले. जर असे झालेच तर, याचा फायदा होण्याऐवजी भाजपला अधिक नुकसान सहन करावं लागले असेही आठवले यांनी म्हटले आहे. ते टीव्ही 9 या वृत्त वाहिनीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अतिशय दिलखुलासपणे उत्तरं दिली.
राज ठाकरेंचं कौतुक पण....
यावेळी बोलताना आठवले यांनी राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केलं. राज ठाकरे चांगले नेते आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते मात्र, त्यांना हवी तशी मतं मिळवण्यात यश मिळत नसल्याचे आठवले म्हणाले. भाजपनं जर राज यांना एकत्र घेतलं तर, याचा परिणाम दक्षिणी आणि उत्तर भारतीय असलेल्या नागरिकांच्या मतांवर होईल. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची यात काहीच दुमत नाही. मात्र, मुंबईत वास्तव्यास असलेल्या इतर नागरिकांना विरोध करण्याच्या राज यांच्या भूमिकेमुळे याचा फटका भाजपला देशपातळीवर मोठ्या प्रमाणात बसू शकतो असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.
भेटी गाठी घ्या पण युती करू नका
गणपती उत्सव सुरू झाल्यापासून अनेक नेत्यांच्या गणपती दर्शनासाठी भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यावर बोलताना आठवले म्हणाले की, गणपतीच्या दर्शनासाठी नेत्यांनी जरूर नेत्यांच्या घरी जावं मात्र, युती करू नये असा सल्ला त्यांनी भाजपचं नाव न घेता दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.