महाराष्ट्र बातम्या

राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

नामदेव कुंभार

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी अथवा शह देण्यासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी परखड मत नोंदवत नारायण राणे यांना थेट आव्हान दिलं आहे. कोकण शिवसेनेचेच आहे. नारायण राणे यांना शपथ दिल्याने काय होईल ते बघू असं म्हणत कोकण आमचेच असल्याचा विश्‍वास शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.

नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यामुळे कोकणवासीय शिवसेनेला अंतर देतील, असं म्हणण्यात काहीच तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. तसंच कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्हीच बघाल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जातं असलं तरी प्रत्यक्षात कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच, असे आव्हान अनिल देसाई यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देसाई बोलत होते.

कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही, असा विश्वासही अनिल देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई आणि कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

विनायक राऊत काय म्हणाले?

ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये” असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे क्रम प्राप्त आहे. ते करताना कोकणातील वाढत्या शिवसेनेचा प्रभाव लक्षात घेऊन कुणाची तरी वर्णी लागत असेल, तर हे शिवसेनेचं मोठेपण आहे. पण ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये. त्यांनी यापूर्वीची आणि आताची शिवसेना अनुभवलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे. ते पुसण्याचं काम करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT