Bombay high court 
महाराष्ट्र बातम्या

High Court: मुलाला गिफ्ट दिलेला फ्लॅट त्याच्या मृत्यूनंतर विधवा सुनेकडून परत घेता येणार नाही - मुंबई हायकोर्ट

सूनेने हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत सूनेला दिलासा दिला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- मुलाला दिलेले गिफ्ट विधवा सुनेने परत करावेत यासाठी एका वृद्ध जोडप्याने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी निकाल जोडप्याच्या बाजूने लागला होता. मात्र, त्यानंतर सूनेने हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत सूनेला दिलासा दिला आहे.

वृद्ध जोडप्याने पोटगी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली नाही, तर भागिदारी कंपनीतील मालमत्ता मिळावी यासाठी ते कोर्टात आले आहेत. जोडपे कंपनीमध्ये भागीदार आहेत, याचा अर्थ त्यांचा विधवा सूनेच्या संपत्तीवर हक्क मिळू शकतो असं होऊ शकत नाही. तसेच भागिदारी कंपनीतून मिळालेले उत्पन्न कुणाला द्यावे हे ठरवण्याचा अधिकार न्यायाधिकरणाकडे नाही, असं न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी स्पष्ट केलं.

प्रकरण काय?

जोडप्याने १९९६ मध्ये आपल्या मुलाला कंपनीमध्ये भागीदार केलं होतं. मुलाच्या लग्नानंतर त्याने दोन कंपन्या सुरु केल्या. कंपनीतील उत्पन्नाच्या जोरावर मुलाने १८ नवीन मालमत्ता खरेदी केल्या. कर्ज मिळण्यासाठी या संपत्तीचा आधार घेण्यात आला. २०१३-१४ मध्ये आई-वडिलांनी मुलाला चेंबुरमध्ये एक फ्लॅट आणि भायखळ्यात एक गाळा गिफ्ट केला. २०१५ मध्ये मुलाचा मृत्यू झाला.

सूनेने सासू-सासऱ्यांना संपत्तीतील वाटा नाकारला, तेव्हा जोडप्याने न्यायाधिकरणात धाव घेतली. २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने जोडप्याच्या बाजूने निर्णय दिला. गिफ्ट दिलेली संपत्ती परत करण्याचे आदेश दिले. याशिवाय सूनेला आपल्या सासू-सासऱ्यांना महिन्याला १० हजार निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सूनेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती मारणे म्हणाले की, न्यायाधिकरणाला मालमत्तेतील वाटा कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार नाही. तसेच सूनेकडून सासू-सासऱ्यांना निर्वाह भत्ता मिळणे योग्य ठरत नाही. कारण, सून मुल या व्याख्येमध्ये येत नाही. त्यामुळे ती निर्वाह भत्ता देण्यास बांधिल नाही. पण, तिने सासू-सासऱ्यांची काळजी घ्यावी, असं न्यायमूर्तींनी म्हटलं.

वकिलांकडून मालमत्तेची यादी देण्यात आली आहे, पण, मुलाच्या आई-वडिलांच्या ते मालकीचे आहेत याबाबत ते सुचवत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला जोडप्याने कंपनीची भागिदारी संपवण्यासाठी अर्ज करावा, असं न्यायमूर्तींनी म्हटलं. याप्रकरणात सासऱ्याचे मागील वर्षी निधन झाले आहे, तर सासू तिच्या दुसऱ्या मुलाच्या दयेवर जगत आहे. सुनेने सासूला निर्वाह भत्ता देण्याचे मान्य केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे ‘मुख्य नेता’पद आधारहीन; उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

Delhi to Pune SpiceJet विमानात नेमकं काय घडलं? प्रवाशांना श्वास घेणंही कठीण, विमान रणवेवर पोहोचलं अन् प्रवाशांनी उड्डाणच रोखल

Maharashtra Agriculture Department: कृषी विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; सतरा वर्षांनंतर फेररचना; २,६६८ नवीन पदांची निर्मिती

Pune crime news : भाच्याचा संसार उद्ध्वस्त केला; पुण्यात सासऱ्याचा दगडाने ठेचून खून; आरोपी रक्ताने माखलेल्या हाताने पोलिस ठाण्यात हजर

Mumbai Fire: विलेपार्लेत काळरात्र! 11व्या मजल्यावरील आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह मोलकरणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT