railway Metal barriers sakal
महाराष्ट्र बातम्या

Railway Metal Fence : पश्चिम रेल्वेनंतर आता मरेचा वंदे भारतसाठी धातूंचे कुंपण!

मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात १० फेबुर्वरी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून मोठ्या थाटात केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात १० फेबुर्वरी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून मोठ्या थाटात केली.

मुंबई - मध्य रेल्वे मार्गवर धावणाऱ्या मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसला गुरांची धडक होऊ नयेत म्ह्णून कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान धातूचे कुंपण घालण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. यांसंदर्भात रेल्वेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात १० फेबुर्वरी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून मोठ्या थाटात केली. मात्र,आता या आलिशान गाडीत तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांचा तक्रारीचे सत्र सुरू झाले आहेत. रविवारी वंदे भारत ट्रेनचे सॉफ्टवेअर फेल झाल्याने ठाणे आणि दादर स्थानकांवर दरवाजे उघड झाले नसल्याने प्रवाशांना गार्ड कॅबिनमधून उतरविण्याची नामुष्की रेल्वेला आली होती.

परंतु, आता दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला गुरु धडकण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण कल्याण, कसारा आणि कर्जत विभागात सतत गुरांची वळदळ असते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला गुरु धडकल्यास रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम होऊ शकते, इतकेच नव्हेत तर रेल्वे गाडी रेल्वे रुळावरून घसरण्यासह रेल्वे अपघातांची शक्यता आहे, त्यामुळे रेल्वे मार्गावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्तासाठी कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान धातूचे कुंपण घालण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. यांसंदर्भात रेल्वेकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

२४५.२६ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्सप्रेसला सतत गुरांची धडक होण्याचा घटना घडत होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान सुमारे ६२२ किमी लांबीचे धातूंचे कुंपण बंधने सुरु केले असून त्याला अंदाजे २४५.२६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आता मध्य रेल्वे सुद्धा धातूंचे कुंपणा बांधण्याचे नियोजन करणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwalच्या गळ्याभोवतीचा फास आवळला, महिला व्यावसायिकलाही धमकावलं| Pune police | Sakal News

मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार! लवकरच हाय-टेक कॅंडेला बोटी समुद्रात उतरणार, कशी आहे रचना?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 'आयएनएस विक्रांत'वर जवानांसोबत साजरी केली दिवाळी; म्हणाले- माझ्यासाठी भाग्याचा क्षण

World Osteoporosis Day 2025: चाळीशीतच हाडे ठिसूळ होण्याचा धोका, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची वाढती समस्या; जाणून घ्या कारणे अन् उपाय

भावा...! Adam Zampa च्या नावाने आर अश्विनला मॅसेज; माजी फिरकीपटूने घेतली मजा, मोहम्मद शमीलाही तोच मॅसेज अन्...

SCROLL FOR NEXT