महाराष्ट्र

साहित्य संमेलनावरील पावसाच्या सावटाबद्दल भुजबळ म्हणतात; 'जणूकाही पाऊस पडला...'

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यभर सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका आता नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला देखील बसला आहे. या संमलेनाचे स्वागताध्यक्ष असलेले नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाच्या सभामंडपाची पाहणी केली आहे. तसेच पावसामुळे काही व्यत्यय येईल का, यासंदर्भात वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटलंय की, दोन लस घेतलेल्या लोकांनाच प्रवेश असेल. डॉक्टर, ऍब्यूलन्स वगैरेची सुविधाही उपलब्ध असेल. काल अचानक पाऊस आल्यामुळे पाणी साठण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, जर कुठे लिकेज असेल तर ते थांबवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जर पावसाच्या पाण्यामुळे कुठे चिखल तयार झाला असेल तर तो उद्या तुम्हाला दिसणार नाही, त्याबाबतचं काम सुरु असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय. निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पडेल. पावसामुळे कुठेही काही अडचण निर्माण झालीय, असं होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, सगळे कार्यक्रम जणूकाही पाऊस पडलाच नाही, आणि पडलाच नव्हता, अशा वातावरणात पार पडतील, असं त्यांनी म्हटलंय. काही ठिकाणी फोटो आलेले आहेत. मात्र, ते फोटो मुख्य सभामंडपाचे नसून बाहेरच्या उपमांडवाच्या भागातले आहेत. लोक मुख्य सभामंडपात बसणार आहेत. त्यामुळे त्याची अडचण येणार नाही. कुठेही पाण्याचा मागमूस दिसणार नाही. जिथे गळतंय त्यावर काम केलं जातंय. स्वयंपाक घरात हजारो लोकांचं जेवण निर्विघ्नपणे बनवलं जाईल. आज दुपारपर्यंत सगळ्या त्रुटी बाजूला सारल्या जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून मैदानात, दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज

Marathi News Live Update: होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग; जवळच्या इतर अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

VIDEO: 'गजगामिनी चाल' म्हणजे काय? अदिती राव हैदरीच्या 'त्या' वॉकनं नेटकऱ्यांना लावलं वेड, व्हिडीओ होतोय व्हायरल

Loksabha Election Voting : आयर्लंड, अमेरिकेहून येत दांपत्य, युवतींचे मतदान; मराठवाड्यातील परदेशस्थ भारतीयांनीही बजावले राष्ट्रीय कर्तव्य

SCROLL FOR NEXT