ajit pawar devendra fadnavis eknath shinde 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी अजित पवार? एकनाथ शिंदे म्हणाले...

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील गैरहजर राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्या जागी समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांना संधी देण्यात येणार का? त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील यांच्या गैरहजेरीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये नाराजी दिसून आली होती. शिवाय चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अध्यक्ष करा अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती.

दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणासाठी सकारात्मक नसल्याचा आरोप केला होती. तसेच समितीचे अध्यक्ष पाटील नव्हे तर अजित पवार यांना करा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता काही क्षण ते स्तब्ध झाले. शिंदे पुढं म्हणाले की, अजितदादांना अध्यक्ष करण्याची मागणी झाली आहे. अजितदादांकडे पाहात, शिंदे म्हणाले, त्यावर विचार करून निर्णय घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT