Sachin Waze Letter To ED e sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुख प्रकरणी चांदीवाल आयोगाची सुनावणी पूर्ण; सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

शंभर कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाची या आयोगाकडून चौकशी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य शासनानं नेमहलेल्या चांदीवाल आयोगाची (Chandiwal Commission) चौकशी पूर्ण झाली आहे. यानंतर आता हा चौकशी अहवाल राज्य शासनाकडं पाठवला जाणार आहे. यानंतर राज्य सरकार यावरुन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या तुरुंगात आहे. (Chandiwal Commission hearing in Anil Deshmukh case completed)

शंभर कोटी वसूली प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगात गुरुवारी अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर आज हजर झाले होते. आजच्या शेवटच्या सुनावणीनंतर आयोग आपला निर्णय सीलबंद लिफाफ्यात महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करणार आहे.

दरम्यान, चांदीवाल आयोगाचं कामकाज पूर्ण झाल्यानं 22 मार्च रोजी हा अहवाल तयार करुन तो 23 मार्चला सीलबंद केला जाईल. यानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. यानंतर राज्य सरकार यावर योग्य तो निर्णय घेईल. पण हा निर्णय काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT