Sachin Waze on Anil Deshmukh Money Laundering Case e sakal
महाराष्ट्र बातम्या

वसुलीचे पैसे कोणाला दिले? चांदीवाल आयोगाला दिलेल्या अर्जात वाझेचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणाच्या आरोपाखाली सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) पोलिस कोठडीत आहेत. तसेच सचिन वाझेची (Sachin Waze) देखील चांदीवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) चौकशी सुरू आहे. पण, यापूर्वी वाझेने आयोगासमोर दिलेला जबाब बदलण्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये वाझेनी आणखी काही खुलासे केले आहेत. (Sachin Waze on Anil Deshmukh Money Laundering Case)

शंभर कोटी वसुली प्रकरण आणि पोलिसांच्या बदली प्रकरणी चांदीवाल आयोगाकडून सचिन वाझे आणि अनिल देशमुख दोघांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलट तपासणी केली असता देशमुखांनी मला पैसे वसुली करण्याचे आदेश दिले नाहीत, असा जबाब वाझेनी दिला होता. आता तोच जबाब बदलण्यासाठी अर्ज केला आहे. ''अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून मी वसुली केली आणि वसुली केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले,'' असा आरोप वाझेने केला आहे. पण, चांदीवाल आयोगाने हा अर्ज फेटाळला आहे.

अर्जात काय म्हटलं? -

मला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आल्यापासून मला गरजेच्या वैद्यकीय बाबी पुरवल्या नाहीत. मला गोरेगावच्या प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला. देशमुख हे पावरफुल व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही माझ्यावर त्यांच्या काही लोकांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर दबाव टाकून मानसिक त्रास देणाऱ्यांची नावे मी घेणार नाही. कारण मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझं अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा मला उपचार देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मला आणि परमबीर सिंग यांना खोट्या खडणीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, असे खळबळजनक आरोप वाझेनी केले आहेत.

अनिल देशमुख पोलिसांनी शंभर कोटी वसुलीचे टार्गेट देत होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या लेटरबॉम्बनंतर देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देशमुखांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाची छापेमारी झाली. यामधून काही माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे. काही दिवस गायब असलेल्या अनिल देशमुख तीन महिन्यापूर्वी ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी अटक करण्यात आली. देशमुखांनी खरंच पोलिसांच्या बदलीमध्ये घोटाळा केला आहे का? याप्रकरणी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाकडून सचिन वाझे आणि अनिल देशमुखांची तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT