Chandrakant Patil-Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

"तुमचा कव्हर ड्राईव्ह…! "; संजय राऊत यांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यातीस संघर्ष मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीका केली होती, त्यांनी नागपूर दौऱ्यानंतर पेनड्राईव्ह बाळंत झाले असून यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळंत होतात का? असा सवाल करत आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह काढू जो भाजप(BJP) ला भारी पडेल असा इशारा दिला , त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत राऊतांच्या या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत झालेल्या शिवसेनेच्या पराभवाची आठवण करुन देत "अहो संजय राऊत, आता झालेल्या निवडणुकीत तुम्ही मारलेला कव्हर ड्राईव्ह संपूर्ण देशाने पाहिला ,तुमचा कव्हर ड्राईव्ह नोटाच्या पुढे देखील जात नाही!" असा खोचक टोला लगवाला आहे.

काल राऊत यांनी भाजप वर जोरदार टीका केली होती, त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी असल्याचे सांगत, त्यांच्या नागपूर दौऱ्यानंतर पेनड्राईव्ह बाळंत झाले आहेत. पण, माझे नागपूर आणि विदर्भाचे दौरे थांबणार नाही. भाजप रोज एक खोटं प्रकरण तयार करतं. यांना पेनड्राईव्हचं बाळंतपण कसं काय जमतं माहिती नाही. पेनड्राईव्ह टेस्ट ट्युब बेबी आहे का? असा सवाल देखील केला होता, यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT