Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: ते पाप मी करणार नाही, मी साधा सरळ माणूस; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटलांच स्पष्टीकरण

ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली.

धनश्री ओतारी

Chandrakant Patil News: मी मुंबईकर आहे. बाळासाहेबांचे मराठी माणसावर ऋण असलेलं मी जाणतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे.

अस विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर केले. तसेच मी साधा सरळ माणूस आहे. गरिबीतून आलो आहे. असही ते यावेळी म्हणाले. (chandrakant patil clarification Babri Masjid Statement )

ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्याच्या वक्तव्याचा नेमका मुद्दा काय याचे स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत वारंवार बोलत असतात पण बाबरी पाडताना कुठे होते? असा पुन्हा सवाल उपस्थित करत हाच मुद्दा माझा होता. असं स्पष्ट केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत अश्रद्ध नाही. त्यांचा अनादर होईल असं माझा तोंडून निघणार ही नाही.

त्या मुलाखतीत मी आदर व्यक्त केला आहेच. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेत सांगा की, बाळासाहेबांद्दल अनादर नाही.

विषय सुरू आहे तो अयोध्येचा. धाचा पडताना एखाद्या संघटनेचा बॅनर खाली असतील तर ते विश्व हिंदू परिषदेच्या बॅनर खाली होते. सगळे हिंदू होते. शिवसैनिक असा भेद नव्हता. कुठल्या एका पक्षानं बाबरी पाडलेली नाही.

माझा त्यातला जो सवाल आहे जो लागला आहे तो म्हणजे संजय राऊत कुठे होते? संजय राऊत वारंवार बोलत असतात. बाळासाहेबांबद्दल बोलताना मी नेहमी श्रद्धा व्यक्त केली आहे. बाळासाहेबांमुळं हिंदू जिवंत राहिलं.

उद्धव ठाकरे आणि माझे संबध चांगले आहेत. बाळासाहेबांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. त्यांच्याबद्दल मी अशब्द बोलेण का? सगळे हिंदू होते. शिवसैनिक असा भेद नव्हता. कुठल्या एका पक्षानं बाबरी पाडलेली नाही.

पाडण्याचा संघर्ष विश्व हिंदू परिषतेच्या नेतृत्वाखाली झाला. भाजप सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली होते. सातत्याने ८३ पासून संघर्ष झाला.

पण बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. ते पाप मी करणार नाही, मी साधा सरळ माणूस आहे. असही पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT