Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

सतेज पाटलांनी हद्दवाढीची 'ती' पाच गावे घोषित करावी; चंद्रकांत पाटील

सतेज पाटील यांनी आचारसंहिता भंग केला-चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापूर शहरात जवळची चार-पाच गावे समाविष्ट करणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा १२ एप्रिलपर्यंत आहे की राजकीय आहे हे स्पष्ट करावे असा टोला भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला. आज ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांनी आचारसंहिता सुरू असताना ही घोषणा करून आचारसंहितेचा भंग केला आहे. शहरासाठी हद्दवाढ गरजेची असल्याने आमचा या घोषणेला पूर्ण पाठिंबा आहे. पण त्यांनी घोषणा मनापासून केली का निवडणूकीपुरती केली हे स्पष्ट करावे. तसेच हद्दवाढीत येणाऱ्या पाच गावांची नावेही सांगावीत म्हणजे लोक त्यांच्या घरात घुसतील की नाही हे बघाच असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले, भाजप सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना विरोधासाठी उठवून बसवले. शेवटी फडणवीस यांनी प्राधिकरण करून विषय पूर्णपणे संपविला. त्यामुळे सतेज पाटील यांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी असेही ते म्हणाले.

सतेज पाटलांनी काय घोषणा केली

शहराची हद्दवाढ अनेक वर्षे नैसर्गिक झालेली नाही. १९७२ ला महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी शहराची जेवढी हद्द होती, तेवढीच आजही आहे. हद्दवाढ झाली नसल्याने केंद्र शासनाच्या विविध योजनासाठी कोल्हापूर पात्र ठरत नाही. परिणामी निधी मिळत नसल्याने शहर विकासापासून वंचित राहत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात जवळची चार-पाच गावे समाविष्ट केली जाणार असून कोल्हापूर महापालिकेचे १०० प्रभाग होणार असल्याचे संकेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT