Chandrakant Patil meets and talks with Pankaja Munde  
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंची मनधरणी

सकाळ वृत्तसेवा

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा होत असताना, भाजपमधील नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून सुरु आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यात गेल्या अर्धा तासापासून बंद दरवाज्याआड चर्चा सुरु आहे. 

पंकजा मुंडे यांनी आज (ता.१२) स्वाभिमान दिवस असून आपण सर्वांनी यावे, असे आवाहन केले होते. या निमित्त होणाऱ्या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांच्या अनुषंगाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि लागलेल्या बॅनरवर कुठेही पक्षाचे चिन्ह वा बड्या नेत्यांचे फोटो नसल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

परळीजवळील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले का, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT