chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools  Sakal
महाराष्ट्र बातम्या

फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने गदारोळ

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं असून यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. शाळा कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे पाटील म्हणाले की, ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT