chandrakant Patil latest news 
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण...

'राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये'

सकाळ डिजिटल टीम

'राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये'

देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नसल्यानं सत्ताधारी नेत्यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटलं असून यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (chandrakant Patil latest news)

पाटील म्हणाले, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं होतं, मात्र मी बोलणार नाही असं अजित पवार यांनी आधिच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या अपमानाचा विषय नाही, असंही पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे. विधान परिषद निवडणूक आणि लोकसभा प्रवास अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. यामध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात ते म्हणाले, विधान परिषदेत भाजपचा गुलाल उधळला जाणार आहे. भाजपमध्ये जातीचे राजकारण होत नाही. विधानपरिषदेसाठी पूर्व योजना तयार केली असून त्यावर या बैठकीत चर्चा केली आहे.

दरम्यान, देहु येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही, यावरून वादाला तोंड फुटल होतं.

या वादावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT