Chandrakant Patil
Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र

चंद्रकांतदादा म्हणतात, बंडातात्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय...

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रतिनिधी महिलांबाबत बेताल वक्तव्य करणार बंडातात्या कराडकर यांच्यावर सध्या सर्व स्तरातून टीकची झोड उठवली जात आहे. दरम्यान, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही सुरु आहे. (Bandatatya Karadkar) कराडकर यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र राज्यसरकार रोज नवा विषय काढून लक्ष विचलित करत असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aaghadi Sarkar) नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'आम्ही घटना मानतो, न्यायालय मानतो, आम्ही महाविकास आघाडी सारखे बोलत नाही, आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालय चांगले, CBI चांगली आणि विरोधी बाजूने निर्णय लागला की भाजपच्या (BJP) इशाऱ्यावर असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. परंतु न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आम्हाला मान्य आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, ज्या प्रकारे 12 आमदारांसाठी लढलो त्याप्रकारे लढू' असंही पाटील यांनी नमूद केलं आहेत.

दरम्यान बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दारूच्या निर्णयामुळे व्यथित होऊन ते बोलले. मात्र रोज एखादा नवीन विषय काढायचा आणि लक्ष विचलित करायचा असं महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. जोपर्यंत खेचून काढत नाही तोपर्यंत सत्ता भोगायची ही या सरकारची नीती आहे. इतके आरोप होऊनही यांना काहीच वाटत नाही. आम्ही आहोत म्हणून एवढं तरी आहे नाहीतर हे सरकार काय करेल याचा काही नेम नाही.

पुढे ते म्हणाले, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) जे बोलतात, ते करतात. ते त्यावेळी बोलतात तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असतात. सुजित पाटकरच्या कंपनीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या मुलीची भागीदारी आहे. या बातम्या आल्या आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडे एवढंच नाही आणखी बरेच काही असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

अमृता (Amruta Fadnavis) वहिनी काय म्हणाल्या मला माहित नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत असून त्यावर मी बोलणार नाही. तसंच निर्णय सरकारच्या विरोधात लागला तर यात भाजपचा हात आहे. असं म्हणायचं आणि त्यातून सहानुभूती मिळवायची, असं सोईचं राजकारण सुरू आहे. एका अर्थाने टोळीचं राज्य सुरू आहे, अतियश मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याची टीकाही पाटील यांनी महाविकास आघाडीवरती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT