Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यात सत्ताबदल होणार हे कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी बोललो'

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशचे निकाल १० मार्चला लागणार आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

पुणे - शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या पत्रात खळबळजनक असे दावे केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी मदत करा अशी मागणी काही लोकांनी महिन्याभरापूर्वी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. १० मार्चनंतर राज्यात सत्ताबदल होईल असं त्यांनी म्हटलं. मात्र यावर त्यांनी कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी असं म्हणायचं असतं असंही म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. सत्तेचा दुरुपयोग राज्यात चालला आहे, किरिट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यात पुणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात त्यामुळे राज्यात १० मार्चनंतर भाजपचं सरकार येईल असं कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी बोललो.'

कार्यकर्त्यांनी त्यांची अस्वस्थता मांडली. त्यांना काळजी करू नका असं सांगत १० मार्चला उत्तर प्रदेशमध्ये निकाल लागल्यानंतर सरकार येईल असं म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडून तक्रारी आल्या की आम्हाला त्रास होतोय. तेव्हा १० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदल होईल काही काळजी करू नका असं म्हटलं. एखाद्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे होणारा डिस्टर्बन्स वाटत असतो त्यावेळी असं म्हणायचं असतं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT