Chandrasekhar Bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Chandrasekhar Bawankule : "डबल इंजिन सरकारमध्ये डबे जोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील"

प्रतीक जोशी

एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन आता वर्ष होत आहे. मात्र अजूनही दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना-दीड महिन्याने झाला. त्यामुळे विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.

डबल इंजिन सरकारमध्ये डबे जोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनी २ हजारच्या नोटा चलनातून मागे घेतल्याच्या निर्णयावर देखील भाष्य केले. ज्यांच्याकडे इमानदारीच्या नोटा आहेत त्यांना प्रॉब्लेम नाही. ज्यांच्यकडे बेईमानी आणि काळा पैसा त्यांना प्रॉब्लम आहे. अशा निर्णयामुळे काळा पैसा जमविणाऱ्यांना चाप बसेल. जे विरोध करत आहे त्यांच्याकडे काळा पैसा आहे.

त्र्यंबकेश्वर प्रकरणावर बावनकुळे म्हणाले, प्रत्येक धर्माची परंपरा आहे. मात्र ज्या प्रथा नियमात नाहीत त्या थांबल्या पाहिजे. समजात तेढ वाढेल असे कृत्य करू नये. भाजपच्या लोकांनी आंदोलन केले त्यामुळे असंतोष निर्माण झालं नाही. धार्मिक व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न असेल म्हणून आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle East War: 'मिडल ईस्ट सोडा'; अमेरिकेचा नागरिकांना तातडीने प्रदेश सोडण्याचा इशारा, मिडल ईस्टमध्ये पुन्हा संघर्षाचा धोका?

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

SCROLL FOR NEXT