Rana Sakal
महाराष्ट्र बातम्या

अमरावतीचा पुढचा खासदार 'कमळा'चा असेल; बावनकुळेंचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार कमळ चिन्हाचा असेल असं सूचक वक्तव्य भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुढील निवडणूक भाजपकडून लढवणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे आता अपक्ष लढणारे राणा दाम्पत्य भाजपमध्ये प्रवेश करण्याची चिन्हे आहेत.

(Navneet Rana Ravi Rana BJP)

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्यांना अमरावतीत आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात बोलताना सांगितलं की, "राणा दाम्पत्य हे आमच्यासोबतच आहे." तर बावनकुळे यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा आमच्यासोबतच आहेत असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. तर अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा पुढचा आमदार भाजपचा असेल अशा वक्तव्यावर रवी राणा म्हणाले की, "मी युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असून देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे आहेत. तर मी फडणवीस आणि भाजपसोबतच आहे." असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT