Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Bawankule Praises Fadanvis: बावनकुळेंकडून फडणवीसांची स्तुती; म्हणाले,"औरंग्यांच्या प्रेमींना तुरुगांत टाकणारा व्यक्ती..

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.

सकाळ डिजिटल टीम

Chandrashekhar Bavankule praises Fadanvis: महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. प्रत्येक पक्षाकडून शाब्दिव वार-पलटवार होऊ लागले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या उद्धव ठाकरेंनी अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत भारतीय जनता पक्षावर सणसणीत टीका केली होती.

त्यांनी केलेल्या या टीकांवर भाजप आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजीही व्यक्त केली. अशातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सणसणीत टीका करत अनेक आरोपही केले. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा देखील केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली तर, उद्धव ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोपही केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्यांच्या प्रेमी पडलेल्या लोकांना तरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे."

यापुढे उद्धव ठाकरेंवर आरोप करतं ते म्हणाले की," जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा व्यक्ती कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे." त्यांच्या या विधानात त्यांनी उद्धव ठाकरेंवर नक्षलवादाला खतपाणी घातल्याचा गंभीर आरोप केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांची स्तुती केली. यापुढे फडणवीसांबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, "कोविडच्या काळात मी साक्षी आहे, कोविडच्या आयसीयू पर्यंतच्या पेशंटपर्यंत जाऊन, त्याची विचारपूस करुन महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय दवाखान्यात दौरा करुन राज्याचा विरोधी पक्ष नेता कसा असावा याचा प्रत्यय त्यांनी दिला. कोविड काळात रुग्णांना सर्व सोयी कशा मिळतील. रुग्ण कशा परिस्थीत आहे याची विचारपूस केली."

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिलायं. जर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबद्दल कोणतेही वक्तव्य केले तर ज्या ठिकाणी वक्तव्य केलंय, त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा बावनकुळेंनी दिली. याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकांचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT