महाराष्ट्र बातम्या

Bawankule : ''झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही का?'' बावनकुळेंच्या कसिनोवरील स्पष्टीकरणावरून राऊत भडकले

संतोष कानडे

मुंबईः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे. या फोटोवरुन बावनकुळे हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचा आरोप केला जातोय. त्यावर महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. शिवाय बावनकुळे यांनीही स्पष्टीकरण दिलंय. त्यामध्ये त्यांनी कुटुंबासह फिरायला गेल्याचं सांगितलं आहे.

संजय राऊतांचं ट्वीट

ते म्हणे..

फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.

त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?

ते म्हणे..

कधीच जुगार खेळले नाहीत..

मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?

जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!

झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!

संजय राऊतांचं दुसरं ट्वीट

19 नोव्हेंबर

मध्यरात्री

मुक्काम पोस्ट: मकाऊ, veneshine.

साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.

हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?

ते तेच आहेत ना?

संजय राऊतांचं तिसरं ट्वीट

महाराष्ट्र पेटलेला आहे...

आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.

फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है...

महाराष्ट्र भाजपचं ट्वीट

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.

ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.

असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यंच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?

चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण देणारं ट्वीट

मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT