Chandrashekhar Bawankule News esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात गुंडगिरीला थारा नाही, शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा त्वरित घ्यायला हवा.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा त्वरित घ्यायला हवा.

Chandrashekhar Bawankule News : शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राजीनामा घ्यावा. सध्या जितेंद्र आव्हाडांकून राजीनाम्याची नौटंकी सुरु आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे पुढं म्हणाले, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा त्वरित घ्यायला हवा. सरकार गेल्यामुळं अजितदादांची केविलवाणी वक्तव्य समोर येत आहेत. अजित पवार अस्वस्थेमध्ये बोलताना दिसत आहेत, अशी टीका त्यांनी अजितदादांवरही केली. सध्या राज्यात गुंडगिरीला थारा नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत म्हणून अशांवर कारवाई होत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अनेक विकासकाम होताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आंदोलन करताना आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. यावर बावनकुळे म्हणाले, तो व्हिडिओ पाहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नैतिकता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करायला हवं. तसंच, अशा घटना होत राहतात असं बोलणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही बावनकुळेंनी केलीय.

राज्यात आता तातडीनं कारवाई होते. अडीच वर्षाच्या काळात मविआचे सीएम, डीसीएम कमजोर होते. मविआ सरकारच्या काळात गुन्हेगारांचं समर्थन केलं गेलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT