Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: 'देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर, त्यांच्या...'; बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये बोलतांना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'काहीजण सांगतायत की, आता हे काँग्रेस फोडणार आहेत. मग आणखी एक उपमुख्यमंत्री करावा लागेल. फडणवीस मग मस्टर मंत्री राहणार का?' असा सवाल उपस्थित करत फडणवीसांवर हल्लाबोल केला होता.

ठाकरेंच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. "देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

काय लिहलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये?

'ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?', असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना केला आहे.

'तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. मा. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं', असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

'औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय', असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT