Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'मविआ'ला धक्का; चंद्रकांत पाटील

कृत्रिम बहुमताच्या जोरावर देशाच्या संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या महाविकास आघाडीचा प्रयत्न अयशस्वी झाला.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) रद्द करण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयावर स्वागत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil)यांनी केले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi)टीका केली. मनमानीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हणत मविआ सरकारचा 'हम करे सो कायदा' न्यायालयानेच धुडकावून लावला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर स्वागत करतो असे त्यांनी ट्विट केले आहे. कोल्हापुरात (Kolhapur)शेतकरी पक्षाचे जेष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.

ते म्हणाले, कृत्रिम बहुमताच्या जोरावर देशाच्या संविधानाचे उल्लंघन करणाऱ्या महाविकास आघाडीचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. न्यायालय आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास होता. त्यानुसार आज न्याय मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान याबाबत त्यांनी ट्विट करत ते म्हणाले, भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अशा मनमानीमुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हणत मविआ सरकारचा 'हम करे सो कायदा' न्यायालयानेच धुडकावून लावला आहे. या देशात न्याय शिल्लक आहे, याची प्रचिती या निर्णयामुळे झाली.असे ही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना गारपिटीनंतर, अतिवृष्टीनंतर, पूरानंतर योग्य नुकसानभरपाई दिलेली नाही. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण केली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर फळांना योग्य भाव द्यावा. दारुचा सुळसुळाट करून शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का असा सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT