amit deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

वैद्यकीय शिक्षण शुल्काचा बदल करण्याचे सुतोवाच; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद: रशिया- युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्या ठिकाणाहून त्यांची सुटका करण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. त्या ठिकाणचे वैद्यकिय शिक्षण भारतातील शिक्षणापेक्षा तुलनेने स्वस्त असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी तिकडे जाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या अधिक आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, मी वैद्यकीय शिक्षण शुल्काचा आढावा घेणार असून त्या शुल्कात काही बदल करायचे का? याचाही आढावा मी घेईन. (Amit Deshmukh)

‘‘वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने विद्यार्थी विदेशात जातात. युक्रेनच्या वैद्यकीय शिक्षणातील शुल्क आकारणी प्रारूपाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याची सूचना सचिवांना केली आहे. या अहवालानंतर शुल्कात काही बदल करायचे का, याचा आढावा घेण्यात येईल,’’ असे अमित देशमुख यांनी सांगितले. सध्याच्या व्यवस्थेला कायद्याचा आधार आहे. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारला एकत्रित काम करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, देशात आघाडीचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात उत्कृष्ट काम करून देशाला दिशा दाखविली आहे. याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल व त्याचे नेतृत्व राहुल गांधीच करतील, असा दावाही अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला आहे.

काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा मराठवाडा विभागाचा आढावा मंगळवारी चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसॉर्ट येथे घेण्यात आला. या वेळी देशमुख बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सचिव संपत कुमार, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशीलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. कोविड काळात जगभरात रुग्णांचे हाल झाले. उपचार मिळाले नाहीत, म्हणून बळी गेले. पण आघाडी सरकारने कोरोना काळात अनेक क्षेत्रांत केलेले काम देशात दिशादर्शक ठरले. देशातही महाविकास आघाडीचे वारे आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा देशमुख यांनी केला.

एक कोटीचे उद्दिष्ट, नोंदणी लाखही नाही

आढावा बैठकीत डिजिटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यातून एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत एक लाखाचा आकडादेखील ओलांडता आला नाही. त्यामुळे उर्वरित महिनाभरात चांगले काम करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT