Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: 'मी सरकारमध्ये म्हणून माझी भूमिका...', 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण

ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल टीका केली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऐतिहासिक घटनांबाबत वारंवार वादग्रस्त विधानं करणारे संभाजी भिडे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी काल टीका केली होती. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावं ठेवत नाहीत, अशा शब्दांत भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्याच्यावर टीका केली.

स्पष्टीकरण देताना छगन भुजबळ बोलताना म्हणाले की, सरकारमध्ये आहे म्हणुन मी माझी भूमिका बदलणार नाही. माझी जी भूमिका आहे तिच्यावर मी ठाम आहे ती बदलणार नाही. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतु नाही असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. तर सरकारमध्ये आहे म्हणून भूमिका बदलेल असं नाही असंही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

'कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. महात्मा फुले यांना भिडेंनी आपला वाडा दिला म्हणून तिथे शाळा सुरू झाली. ब्राम्हण आहेत म्हणून विरोध नाही. पुर्वी ब्राम्हणांच्या मुलींनाही शिक्षण नव्हतं. ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासीक पुरावा आहेत त्याच्यावर चर्चा करता येईल', असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, 'आमच्या घरात सगळे देव आहेत. पुढे ते म्हणाले आमच्या एका मित्राने सांगितलं लक्ष्मी चालते मग सरस्वती का नाही, आम्हाला सगळे चालतात. माझ्या घरी भवानी मातेची पुजा होते. सप्तश्रृंगीची पुजा होते. खंडोबा, ज्योतीबा, म्हसोबा सर्वांची पुजा होते', असंही ते म्हणाले आहेत.

तर ते पुढे बोलताना म्हणाले की, 'संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही ते स्पष्ट करावं, त्यांना संभाजी भिडे हे नाव का घ्यावं लागलं संभाजी भिडे हे नाव घेण्याची गरज का भासली. आपापल्या नावाने प्रबोधन करा. पंरतु हे नाव घ्यायचं, आणि बहुजन समाजात जायचं, ते बरोबर नाही. ते बाहेर काय बोलतात हे सर्वांना माहिती आहे, त्याला आम्ही विरोध करणार', असंही ते म्हणाले आहेत.

'मी ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीत शिवाजी, संभाजी, धनाजी सगळी नावे आहे. पुढे मुलं झाली तर नक्कीच संभाजी, शिवाजी नावं ठेवील. जे कोणी लोकं त्यांची (संभाजी भिडे) बाजू घेतात, किंवा त्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते एवढ्या निर्भिडपणे महात्मा गांधी, फुले यांच्याबद्दल बोलतात, अगोदर त्यांनी स्वतःचे नाव स्पष्ट करावे', असं भुजबळ म्हणाले आहेत.

'मी सरकारमध्ये असलो, नसलो तर माझी भूमिका शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे असणार आहे', असंही ते पुढे म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

ब्राह्मणांवर मी टीका करत नाही. पण एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे ब्राह्मणांमध्ये शिवाजी आणि संभाजी ही नावे ठेवली जात नाहीत, असं सांगतानाच देशात फक्त साडेतीन टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांनाच शिक्षणाची दारे खुली होती. ब्राह्मणांनी ब्राह्मण स्त्रियांनाही शिक्षणापासून वंचित ठेवले होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच सर्वांना शिक्षणाची दारे खुली झाली, असं विधान राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT