Chhagan Bhujbal On manoj jarange patil hunger strike Maratha Reservation in Assembly Special Session latest marathi news  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : विशेष अधिवेशनात कोणी विरोध करणार नाही, कारण...; मराठा आरक्षणावर भुजबळांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange Patil hunger strike Latest News : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे.

रोहित कणसे

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी काढलेल्या अधिसूचनेच्या अमंलबजावणीसाठी विशेष अधिवेशन तातडीनं घेऊन त्यात कायदा पारित करावा यासाठी मनोज जरांगे १० तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या या आंदोलनावर भाष्य केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केलेल्या शिवीगाळीसंबंधी देखील भुजबळांनी वक्तव्य केलं आहे.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका, सगेसोयरे याची नको ती व्याप्ती वाढवू नका यासाठी आमची लढाई सुरू आहे.

त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आहे. काँग्रेसच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला गेला पण तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेला कायदा हायकोर्टात टीकला पण सर्वोच्च न्यायालयात टीकला नाही. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्यांनी नेमला. क्युरेटीव्ह पेटीशनसाठी तीन न्यायाधीश बसले आहेत. हे सगळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल यासाठीच बसले आहेत. याला आमचा पाठिंबा आहेच. हे १५ तारखेपर्यंत येईल असं वाटलं होतं.

कदाचित जरांगेंना वाटलं असेल १५ तारखेला येणारच आहे. मराठा आरक्षण वेगळं मिळणारचं आहे. तर आपण १० तारखेलाच उपोषणाला बसावं, म्हणजे मग श्रेय सुद्धा मिळू शकतं. त्यांची तो समज चुकीचा नाहीये. १० तारखेला उपोषणाला बसले आणि १५ तारखेला आरक्षण मिळालं की दुसरा गुलाल उधळाता येईल. पण ते काम पूर्ण नाही झालं. ते पाच-सात दिवस पुढे गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला.

ते आता मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मला शिव्याच देऊ लागले आहेत. ते पण आईवरून गल्लीतले लोक देतात तशा शिव्या देत आहेत. तेथील डिव्हीजनल कमिशनर, एसपी, कलेक्टर यांना देखील शिव्या दिल्या. तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पास करत आहोत. त्यामुळे कोणाला शिव्या देऊन काय फायदा आहे?

कुणबी, सगेसोयरेच्या माध्यामून तुम्ही घुसवलं त्याविरोधात आमचा लढा रस्त्यावर आणि कोर्टात सुरूच राहणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भुजबळ म्हणाले की, एकच दिवसाचं अधिवेशन असेल आणि एकाच दिवसात ते मार्गी लागेल. कारण कोणी विरोध करेल असं वाटत नाही. भाषण करतील पण विरोध कोणी करणार नाही. कारण सर्वांची मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसीमधून नाही. तर वेगळं आरक्षण मराठ्यांना द्या हा तो प्रस्ताव आहे, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. ते शक्यच नाही. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीमधून आरक्षण नाकारलं आहे.

जरांगेंची तब्येत खालावली...

दुसरीकडे उपोषण करत असेल्या जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. यादरम्यान सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आज पाण्याचे काही घोट घेतले आहेत.

जरांगे यांच्या पोटात दोन दिवसांपासून अन्न नसल्यानं त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. तसेच त्यांच्या नाकातूनही रक्त आल्याचं वृत्त होतं. काल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं त्यांच्या नकळत सलाईन चढवलं होतं. यामुळं त्यांची प्रकृती काहीशी स्थिर बनली होती, पण हे सलाईनही त्यांनी नंतर काढून टाकलं. पण आता त्यांची प्रकृती आणखीनच ढासाळली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही घोट पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी पाणी घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: नाराज इच्छूकांनी अर्ज माघारी घ्यावेत- हसन मुश्रीफ

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT