Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"पहिली सभा येवल्यातंच का घेतली? मी भविष्यात मोठे गौप्यस्फोट करणार"; भुजबळांचा पवारांना इशारा | Sharad Pawar

या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांच्या अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दत्ता लवांडे

नाशिक : राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आणि पहिली सभा माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात घेतली. पण त्याच दिवशी छगन भुजबळ यांनीसुद्धा मतदारसंघात आपलं शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत आणि सभेत भुजबळांवर केलेल्या टीकेवर भुजबळांनी उत्तर दिलं आहे.

"शरद पवारांनी कालच्या सभेत सांगितलं की मी त्यांना येवला मतदारसंघ दिला पण तसं नाही येवला मतदारसंघ मी साहेबांना मागून घेतला" असं भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर तुमच्या जवळचे लोकं तुम्हाला सोडून का जातात याचा विचार करा, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिलाच कशाला, मी भविष्याच खूप मोठे गौप्यस्फोट करणार आहे असा इशारा भुजबळांनी पवारांना दिला आहे.

शरद पवार यांच्या येवल्यातील पहिल्या सभेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तुम्ही पहिली सभा तुमच्या बारामतीत का घेतली नाही? अजित पवार तर बंडाचे प्रमुख आहेत. तेही बारामतीचे आहेत. मग तुमची पहिली सभा दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात ठरली असताना ती येवला या माझ्या मतदारसंघात का घेतली? मी ओबीसी आहे म्हणून तुम्ही येथे सभा घेतली का? असा खोचक सवाल भुजबळांनी पवारांना केला आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, "हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे." शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT